Share

उदयनराजेंना भाजपची ऑफर ? अर्धा तास दरवाजाबंद चर्चा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये यावे अशी ऑफर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

साताऱ्यात भाजपचे मोठे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयाची जागा पाहण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व गिरीश बापट शनिवारी सायंकाळी साताऱ्यात आले होते. चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट सायंकाळी सात वाजता विश्रामगृहावर दाखल झाले. यानंतर काही वेळाने खासदार उदयनराजे भोसले हे देखील तेथे आले.

दरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी उदयनराजे यांच्याशी दरवाजाबंद चर्चा केली. चर्चेचा वृत्तांत गोपनीय ठेवण्यात आला असला तरी आगामी निवडणुकीत उदयराजे यांनी भाजपतर्फे लढावे, असा आग्रह धरल्याची चर्चा विश्रामगृहावर दबक्या आवाजात सुरू होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!