मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. रियाला २१ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“रिया चक्रवर्तीची अमली पदार्थ विरोधी ब्युरोला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली,आता रिया त्या कोठडी बाहेर किती मोठी ‘रांग’ लावते हे पहायचं.,कारण "यहां पत्थर भी बोलता है" असा बोर्ड लटकवलेला असतो म्हणे, ‘ असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान रियाकडे एनसीबेला ड्रग्स संबंधित अनेक पुरावे मिळाल्याने तिला अटक करण्यात आली आहे. तसेच रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युएल मिरांडा हे एनसीबीच्या चार दिवसांच्या कोठडीत असणार आहेत. ड्रग्स संबंधित बॉलीवूडमधील २५ कलाकारांना समन्स बजावण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या


