Share

‘निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेला जनता माफ करणार नाही’

Published On: 

मुंबई : कांदिवली पूर्व येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली असून या भ्याड हल्ल्याचा आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र निषेध केला असून असे कृत्य करणाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हाट्सअप वरुन फॉरवर्ड केलं म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. आता निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला करण्याइतकी खालची पातळी शिवसेनेने गाठली आहे. अशा गुंडांना घाबरून राज्यातील व मुंबईतील जनता गप्प बसेल असे मुख्यमंत्र्यांना व शिवसेनेला वाटत असल्यास ते मोठ्या भ्रमात आहेत. सत्तेचा हा माज जनता येणार्याअ काळात उतरवल्या शिवाय राहणार नाही असेही अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

तर राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्ड वरून झालेल्या वादातून एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना निंदनीय असून राज्यासह देशात अनेक वेळा अशा घटना घडलेल्या दिसून येतात. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय धक्कदायक आणि दुःखद घटना. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्डच्या वादातून शारीरिक इजा करण्यात आली. माननीय उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवावा. या गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो. अस फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

महाराष्ट्रात ‘हिटलर राज’ निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

कोणत्याही गोष्टीबाबत केंद्रसरकारला जबाबदार धरायची राज्य सरकारला सवयच आहे – देवेंद्र फडणवीस

कंगणाचे कार्यालय ‘अधिकृत कि अनधिकृत’ हे विरोधीपक्षानेच सांगावे – परब

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!