मुंबई : शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. आता हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर विरजण पडले असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर, या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते. पण, हे सरकार आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नसल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. एका निवेदनातून देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पहा सविस्तर व्हिडीओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/380010799665167/


