Share

कार्यकर्त्यांनो कामाला लागा, भाजप मंत्र्याचे ‘मध्यावधी’चे संकेत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही. दोनही पक्षाचे नेते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शिवसेना आणि भाजपच्या ताठर भूमिकेमुळे सत्तास्थापनेचा घोळ काही मिटत नाही.

अशातच राज्याचे पर्यटनमंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपला स्वबळावर तयारी करण्याचे निर्देश कार्यंकर्त्यांना देण्यात आले. याला भाजपचे धुळे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही दुजोरा दिला. निवडणुकीत मोठे यश मिळवून राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धुळे येथे जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश दिले. धुळे जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. पैकी चार जागा भाजपने लढल्या होत्या. मात्र, केवळ दोन जागांवरच पक्षाला यश मिळाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191196744211550208?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191196709377859584?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191192058184130560?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190998239169765378?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!