टीम महाराष्ट्र देशा – ‘मागील काही दिवसात राज्यात कायद्याचा बट्टयाबोळ झाला आहे . महिला असुरक्षित आहेत. महाविकासआघाडीचे नेते एकमेकांवर वर्चस्व दाखवण्याकरिता सरास कायदा हातात घेत आहेत. अश्या या सरकारकडून सामान्य जनता कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी काय अपेक्षा करणार ?’ असे ट्वीट करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारवर सडकून टीका केली आहे.
मागील काही दिवसांतील राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांचा सदर्भ देत भाजपने हि टीका केली आहे. तसेच आघाडीतील नेते एकमेकांवर वर्चस्व सिध्द करण्यात व्यग्र असून त्यांचे कायदा आणि सुव्यवस्तेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याच म्हटलं आहे.
तसेच सांगलीतील घटनेचा दाखला देणाऱ्या ट्वीटचाही समावेश भाजपनं यावेळी पोस्टमध्ये केला आहे. आता यावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसात राज्यात कायद्याचा बट्टयाबोळ झाला आहे . महिला असुरक्षित आहेत.
महाविकासआघाडीचे नेते एकमेकांवर वर्चस्व दाखवण्याकरिता सरास कायदा हातात घेत आहेत.
अश्या या सरकारकडून सामान्य जनता कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी काय अपेक्षा करणार ? https://t.co/h6JNVEbEtx
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 7, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

