Share

महाराष्ट्र भाजपचे नेते होतायेत फेसबुक वर ट्रोल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आणि महाराष्ट्रात कोरोनाच संकट गहिरं होत आहे. या वेळी सर्वच पक्षांनी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र यायला हवं आणि कोरोनावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन वेळो वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

परंतु राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप हा राज्य सरकारला सहकार्य करत नसून सरकारवर रोज टीका करत आहे असं सरकारच्या समर्थकांच म्हणण आहे. तसेच भाजपच्या आमदारांनी त्यांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला जमा न करता ते पंतत्रधान मोदी यांनी नव्याने तयार केलेल्या PM CARES या फंडात दिल्यानेही महाराष्ट्रातील बहुतांश नागरिक नाराज आहेत.

आता याच मुद्यावरून फेसबुक या सोशल मिडियावर भाजपच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या समर्थकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या नेत्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर काही पोस्ट केल्यावर त्याच्यावर लाफ्टर / हसण्याची रीअॅ क्शन दिली जात आहे. तसेच कमेंटमध्ये टीका, मेम्स आणि विषयाचा संबंध नसलेल्या गोष्टी पोस्ट केल्या जात आहे.

या ट्रोलिंगचा फटका किरीट सोमय्या, विनोद तावडे, माधव भंडारी , रावसाहेब दानवे , राम कदम , गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना बसला आहे. त्यामुळे सोशल मिडियाच्या वापरावर हुकुमत असलेल्या भाजपलाही आता विरोधकांच्या ट्रोलिंगाचा फटका बसला आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!