मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमी चर्चेत असतात. कधी अग्रलेख तर कधी वादग्रस्त विधाने यामुळे राऊत नेहमी माध्यमांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.यासर्व कारणांशिवाय राऊत आपल्या शेरोशायरी साठी देखील प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी एक ट्वीट केले असून या ट्वीटची चांगलीच चर्चा होत आहे.
महफूज़ सारे बादशाह ,वज़ीर और शहज़ादे हैं |
जो बेघर हैं तूफां में, वो महज़ प्यादे हैं | pic.twitter.com/W4VZOhLwPy
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 21, 2020
महफूज़ सारे बादशाह ,वज़ीर और शहज़ादे हैं |जो बेघर हैं तूफां में, वो महज़ प्यादे हैं | या शेर सोबत संजय राऊत यांनी एक फोटो देखील पोस्ट केला असून त्याची देखील चर्चा आहे. याच मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
शिवराय कुळकर्णी यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
जो बेघर हैं तूफां में, वो महज़ प्यादे हैं |संजयलाला रुलाओगे क्या ? मुंबई अंडर वर्ल्ड चा डॉन करीमलाला याच्या स्मृती चाळवणाऱ्या संजय राऊत यांना सध्या शेरोशायरीचा नाद जडला आहे. तसेही बाडग्यांना नेहमीच निष्ठा प्रदर्शित करावी लागते. कदाचित सुलतानी शौक पाळल्याने नवी वोट बँक आपल्याला त्यांच्याच जमातीतील समजू लागतील, असा ही या नव्या छंदाचा मतलब असावा.
असो, पण संजयलालांनी आज tweet केलेला शेर भन्नाट आहे. गझब ! वाह मियाँ वा ! क्या कहने ! महफूज़ सारे बादशाह ,वज़ीर और शहज़ादे हैं |जो बेघर हैं तूफां में, वो महज़ प्यादे हैं | शेर सोबत एक समर्पक चित्रही त्यांनी जोडले आहे. ते ठाकरे नसल्याने मुख्य न होता कार्यकारीच राहिले म्हणून काय त्यांना संपादकीय गंध नाही, असे कोणी मानू नये. ते आजकाल नव्या संगतीमुळे बखरीतले संदर्भ विसरले असले तरी तोफ, बारुद, बुरुज, निधडी छाती, मावळे, कडेलोट असे शब्द विसरलेले नाहीत.
राज्यातील 29 हजार गरीब कुटुंबांना प्रतिदिन 200 रु.चे प्रतिकात्मक वाटप- सत्यजीत तांबे
रोजच्या मुखपत्रात कढीपत्त्याप्रमाणे आणि कोथिंबिरी प्रमाणे या शब्दांना फोडणी देताना घालावेच लागते. बरं, जाऊ द्या.. आजचा शेर समर्पक आहे. बिचारे कार्यकारी स्पष्ट बोलू शकत नाहीत. काकांच्या कानात अधून मधून सांगतात. पण काका स्वभावाप्रमाणे खळखळून दाद देत नाहीत. सह्याद्रीच्या कडे कपारी यमुनेचे पाणी पाजा, अशा काही ओळींवरच काका दाद देतात. अखेर आज संजयलालांनी tweet करूनच टाकले.
महाराष्ट्राच्या वर्तमान स्थितीवर कार्यकारींनी नेमका प्रकाश टाकला आहे. कोरोनाग्रस्त होण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अजूनही अमेरिका, इटलीशी तुलना केली तर महाराष्ट्राची स्थिती छान आहे. पण एका कार्यकारी संपादकांच्या मनात सल काय असते ती या शेरातून मस्त व्यक्त होते.
महफूज़ सारे बादशाह ,वज़ीर और शहज़ादे हैं |
आता या शेराचा मी अर्थ सांगावा असे नाही. पण राऊतांना काय वाटते, हे महत्वाचे आहे. बादशाह महफूज ! खरोखरच मुख्यमंत्री कुठलाच धोका पत्करायला तयार नाहीत. लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन ! बाहेर यायचेच नाही. आणि हो , मुख्यमंत्र्यांची तयारी आहे कोरोना सोबत राहण्याची पण कोरोनाची तयारी आहे का, मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची ? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, तो पर्यंत लॉकडाऊन. फेसबुक लाईव्ह आहे न संवाद साधायला ! काकासाहेबही सध्या महाराजांवरचे पुस्तक वाचण्यात दंग होते. एक दोन वेळा टीव्हीवर दिसले तर ते पुस्तक बाजूला होतेच. एवढ्यात त्यांचा पत्रलेखनातच वेळ जातो आहे. त्यामुळे ते शेतकऱ्याच्या बांधावर देखील गेलेले नाही. लॉकडाऊन मुळे मंत्री मलबार हिलवरच्या समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यांवर अडकल्याने महफूज आहेत. शहजाद्याची चिंताच नाही. एक खरे की उद्धवजी भाग्यवान आहेत. ते जोपर्यंत बाहेर जात नाही, तो पर्यंत आदित्यजी कधीही घराबाहेर पाऊल ठेवणार नाहीत ! बाहेर कोरोना आहे !! आणि त्याला आपल्यासोबत राहायचे की नाही, त्याने स्पष्ट केलेले नाही ! महफूज़ सारे बादशाह ,वज़ीर और शहज़ादे हैं | महाराष्ट्रासाठी किती समर्पक आहे, तुम्हीच बघा. पण पुढच्या ओळीत शायराने शल्य मांडले आहे. ते संजयलालांच्या मनात आहे की नाही, याचा वेध घेणे कठीण आहे. पण ही ओळ जास्त समर्पक आहे.
निर्देशांचे पालन केले नाही तर कारवाईसाठी तयार रहा, मुंढेंचा इशारा
जो बेघर हैं तूफां में, वो महज़ प्यादे हैं |
कोरोना युद्धात बादशाह, वजीर, शहजादा सारे महफूज असताना महाराष्ट्र कोरोना विरोधात लढतो आहे. पगार कापले, हजारावर सहकारी कोरोनाग्रस्त झाले पण पोलीस लढत आहेत. डॉक्टर्स लढत आहेत. सफाईकर्मी लढत आहेत. बँकर्स, शिक्षक, सरकारी कर्मचारी, आशा सेविका असे असंख्य घटक लढत आहेत. सामान्य लोक कोरोना योद्धे बनले. ते लढत आहेत. किती दिवस कोमट पाणी पिणार ! भेंड्या खेळून थकले बिचारे ! आता सर्वांनी ठरवले लढायचे. त्यात जगले ते जगले मेले ते मेले ! कोरोना वादळात संपणारे बिचारे ते प्यादेच आहेत ना ? वाह वा ! कार्यकारीजी आज तुम्ही या शेरमुळे महाराष्ट्राचे वास्तव मांडून थेट हृदयाला हात घातलात ! अरे रुलाओगे क्या ?
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

