संगमनेर (प्रतिनिधी) : कोरोणा हे मानवजातीवरील संकट आहे. कोरोणाला रोखण्यासाठी केलेल्या लॉग डाऊन मुळे अनेक गोरगरीब मजुरांचे रोजगार गेले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने पॅकेज घोषणा केली. परंतु तिचा लाभ गरिबांना किती व कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील न्याय या योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबियांना सहा हजार रुपये प्रति महिना अशी रक्कम थेट त्यांच्या खात्यावर किमान पुढील सहा महिने तरी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली असून या योजनेअंतर्गत प्रतिदिनी 200 रुपये प्रमाणे प्रतिकात्मक वाटप करण्यात आले..
माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संगमनेर शिवाजीनगर येथे युवक काँग्रेसच्यावतीने न्याय या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबीयांना दोनशे रुपये प्रति दिनाचे प्रतीकात्मक वाटप करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, नगरसेवक नितीन अभंग, गौरव डोंगरे, विजय उदावंत, विशाल वालझाडे ,मुश्ताक शेख आदी उपस्थित होते .
यावेळी सत्यजित तांबे म्हणाले की काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये गोरगरिबांसाठीच्या न्याय योजनेनुसार 1 लाख 44 हजार पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबांना दरमहा 6000 रुपये म्हणजे प्रतिदिन .200 रु. बँक खात्यात जमा करण्याची योजना आणली होती. सध्या लॉग डाऊन मुळे सर्वत्र कामे बंद आहेत .अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत . यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हातावर काम करणाऱ्या गोरगरीब, मजूर, रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार , छोटे शेतकरी अशा लोकांची खूप वाईट अवस्था झाली आहे .केंद्र सरकारने पॅकेज च्या घोषणा केल्या पण त्यांचा गरिबांना किती व कधी लागून हा मोठा प्रश्न आहे .म्हणून देशातील व राज्यातील गरिबांना अशा संकटात तातडीने मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने प्रति महिना 6000 रुपये किमान पुढील सहा महिने तरी द्यावेत .म्हणजे त्या कुटुंबाला थोडासा हातभार लागेल. भलेही केंद्र शासनाने या न्याय योजनेचे नाव बदलले तरी चालेल पण ही मदत करणे अत्यंत गरजेचे आहे.
आज माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील 29000 गरीब कुटुंबांना प्रतिदिन 200 रुपये असे रोख पैसे देण्यात आले आहे . यामुळे काँग्रेसच्या या योजनेचा अनुभव गरीब कुटुंबांना मिळणार आहे केंद्र सरकारने अशा संकटकाळात गरिबांना मदत करताना तातडीने प्रतिदिन 200 किंवा सहा हजार रुपये महिना या कुटुंबीयांच्या खात्यावर त्वरित वर्ग करावी अशी मागणीही सत्यजीत तांबे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.


