Share

‘एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी नाव निश्चित झालं असल्याचं बोललं जातंय.या यादीत असलेल्या नावांमध्ये आता नवीनच नाव समोर येत आहेत आणि त्यात निष्ठावंतांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याचे चित्र आहे.प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता.

उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.

मात्र या चर्चेवरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील’. अस ट्विट करत निलेश राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!