जळगाव : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांना हेलपाटे न मारावे लागता सरकारनं कर्जमाफी दिली. कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
२ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
मात्र, भाजप नेते गिरीश महाजन यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ” राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्राला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असाच हा अर्थसंकल्प असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. सरकारने फक्त मोठे मोठे आकडे सागुन बडेजावपणा केलेला आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची निराशा होणार आहे.
महाजन पुढे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करून त्याची अंमलबजावणी केली होती. आज केलेल्या घोषणासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून आणि खर्च कसा करायचा, याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने अर्थसंकल्पातून फक्त घोषणांचा पाऊस पाडला अंमलबजावणीची स्पष्टता दिसत नाही. तसेच उत्तर महाराष्ट्राला डावलून पश्चिम महाराष्ट्रासाठी भरीव तरतूददेखील या सरकारने केली असून उत्तर महाराष्ट्रातील जनतेवर हा अन्याय आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

