Share

पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने गृहखात्याने उचलेले पाऊल, अनेक उपाय योजनांची केली घोषणा

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह खात्याने पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे. आज कोरोनाच्या लढ्यात अनेक पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य सुरक्षित राहणे महत्वाचे आहे. यासाठीच गृह खात्याने हेल्पलाइन ते ताप तपासणी केंद्रापर्यंत काही उपाययोजना केल्या आहेत.

याबाबतची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते म्हणाले की, राज्यातील पोलिस दल कोरोनाविरोधाच्या लढाईत 24 तास कार्यरत आहेत. कार्यक्षमतेच्या दुप्पट पोलिसांना काम करावं लागत आहे. त्यामुळे साहाजिकच त्यांच्या आरोग्यावर तसेच कुटुंबियाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. राज्यातील जवळपास 900 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या सर्वांच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाने पोलिसांसाठी विविध सुविधा दिल्या आहेत.

हेल्पलाईन : कोरोनाबाधित पोलिसांना कोविड रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार मिळावेत यासाठी एक कोविड हेल्पलाइन संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनद्वारे तज्ज्ञांकडून समुपदेशन आणि मार्गदर्शन केले जाते. हे कक्ष मुंबई पोलीस आयुक्तालयमार्फत मुंबई पोलिसांसाठीदेखील तयार केले आहे.

सुरक्षेसाठी 4 कोटींची साधनसामग्री : सतत कार्यरत असणाऱ्या पोलिसांना कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काही साधन सामग्री दिली गेली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आतापर्यंत जवळपास 7.5 लाख विविध प्रकारचे मास्क 15 हजार लिटर सँनिटायझर, 22 हजार फेस शिल्ड, 44 हॅन्ड ग्लोव्हज, ड्रोन कॅमेरा अशा आवश्यक असलेल्या जवळपास चार कोटी रुपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे. खरेदीचे अधिकार, 137 कोटींचा निधी : पोलिसांच्या आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तूंची कमतरता पडू नये, याकरिता कोविड 19 प्रतिबंधात्मक आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीकरीता पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत. असे अधिकार मुंबई पोलीस आयुक्तालयातही देण्यात आले.

तसेच प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप, कोविड अग्रिम, शासकीय अनुदान, सर्वोत्तम उपचार मिळावेत याकडे लक्ष, वारसांना नुकसान भरपाई., यासारख्या उपाययोजना पोलिसांसाठी गृहखात्याकडून मिळणार आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटींचं पॅकेज केले आहे. यानंतर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, विद्वत्ता संघर्षाचा इतिहास महाराष्ट्राला प्रेरणा देत राहील – अजित पवार

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली, एकूण आकडा 26 हजारच्या जवळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!