🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्र घेतला आहे. तर राज्यातील हिवाळी अधिवेशनातही भाजपने राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर मी पण सावरकर अशा टोप्या घालत सभागृहाबाहेर आंदोलन केले आहे. यावर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप राजकारणासाठी सावरकरांच्या नावाचा वापर करत आहे. सावरकरांचे नाव घेयचे आणि देशातील मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करायचे असा भाजपचा खेळ सुरु आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत मोदी सरकार हे अपयशी ठरले आहे. आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहे. यावरून देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सावरकरांचे नाव घेतले जात आहे, असे चव्हाण म्हणाले.
तर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. देशातील महिलांना सुरक्षित ठेवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे मोदी-शहांनी मान्य करावे, आणि माफी मागवी, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान आज अधिवेशनाला सुरवात होताचं. भाजपने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला आहे. तर राहुल गांधी यांनी जहूर माफी मागावी अशी मागणी केली आहे. सभागृहातही जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या आमदारांनी गदारोळ घातला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206462059489030145?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206456445329240064?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206455615083565057?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
