Share

‘राज्यात भाजपचे सरकार येणारच’; दरेकरांचे सूचक विधान

Published On: 

🕒 1 min read

नंदुरबार : राज्यात महायुती तुटून महाविकास आघाडी सरकार आलं. हे सरकार आल्यापासून विरोधी पक्ष भाजपकडून वारंवार सरकार पडण्याची वक्तव्ये केली गेली. राज्यातील आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हे सरकार कोसळण्याबाबत पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं.

त्या पाठोपाठ आता भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील या संदर्भात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. काल नंदुरबार दौऱ्यावर असताना ते म्हणाले की, ‘राज्यात भाजपचे सरकार येणारच. तो दिवस लांब नाही. फक्त ते आज येईल की उद्या याबाबत आम्ही भविष्यवाणी करणार नाही’, असं प्रवीण दरेकर यांनी सूचक विधान केले आहे.

प्रवीण दरेकरांच्या हस्ते शहादा येथील सातपुडा तापी परिसर सहकारी कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी नंदुरबार बस स्थानकाच्या बाहेर ठाण मांडून बसलेल्या संपकरी एसटी कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपचा कर्मचारी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं सांगितलं.

दरम्यान, यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, ‘दडपशाहीने आंदोलक कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडू नये. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विलीनीकरणाचा शब्द पाळावा. आम्ही सरकारचे अभिनंदन करु. आम्ही कर्मचाऱ्यांसोबत आहोत.’

‘मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने चर्चेस तयार आहे. विलीनीकरण कसे होईल याचा शासनाला मार्ग दाखवतो. परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषदमध्ये काय बोलले हा निर्णय नाही. ज्या घोषणा केल्या त्याच्या अद्यापही लेखी शासन निर्णय नाही’, असे म्हणत राज्य सरकारच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!