Share

विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपने दिली ‘या’ नावाला पसंती

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षाच्या बाकावर बसले आहे. आता विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचा निर्णय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमदार सुजीतसिंह ठाकुर यांचे नाव जवळपास नक्की झाले आहे. ठाकुर यांच्या नावाची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकूर यांच्या नावाला संमती दिली आहे.

विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी अनेक नावांची चर्चा झाली होती.मात्र, पक्ष नेतृत्वाने ठाकुर यांच्या नावाला अधिक पसंती दिली आहे. विरोधी पक्षनेत्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच होणार होती. मात्र, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळीतील मेळाव्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात असल्याने ठाकुर यांच्या निवडीचा विषय मागे पडला होता.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले ठाकूर यांच्या नावाला सर्वांनी एकमताने पसंती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ठाकूर हे फडणवीस यांचे विश्वासू असलेले ठाकुर यांचीच पक्षाने निवड केली असल्याचे सुत्रानी सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांनी पक्ष नेत्यावर केलेल्या जाहीर टीकेमुळ पक्ष नेतृत्व या दोघांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1206067488045195265?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206067956678983680?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!