बुलढाणा : कोरोना काळात भाजपाने देशात हत्याकांड घडवण्याचं पाप केलं, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. ऑक्सिजन पुरवठ्यावरही केंद्राने लक्ष दिले नाही. त्यामुळे या काळात मृत्यूचं पाप भाजपाने केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
दरम्यान नाना पटोले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर हा आरोप केला आहे.
कोरोनाचा आपल्या देशात जेव्हा प्रभाव जाणवत होता ,त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सूचना करुनही आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये आपण पाहिले. लस आपल्याकडे उपलब्ध होती ती पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं काम भाजपने केले. म्हणून या व्यवस्थेसाठी भाजपच जबाबदार आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन असूनही त्याचा पुरवठा कसा केला गेला, हेही देशाने पहिले आहे. त्यामुळे कोरोना काळात देशात एक हत्याकांड भाजपने घडवून आणले आहे. असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
