औरंगाबाद : ज्या मंडळामध्ये ६५ मिमीच्यावर पाऊस झाला आहे. त्या ठिकाणी शेतीचे पूर्ण नुकसान झाले असे गृहित धरले जाते. तसा नियम देखील सांगतो. असे असताना पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती ऑनलाईन शेतकऱ्यांनी द्यावी, हा नियम म्हणजे विमा कंपनीच्या भल्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय असल्याचा आरोप भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व शासकीय कार्यक्रमांवर आम्ही बहिष्कार टाकत असल्याची माहिती त्यांनी औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ज्या मंडळामध्ये ६५ मिमी पाऊस झालेला आहे. त्या मंडळातील शेतऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. राज्य सरकारच्या वतीने ही मागणी मान्य झाली नाही तर आगामी काळात पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशाराही आमदार निलंगेकर यांनी दिला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना या संदर्भातला जाब विचारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची आकडेवारी प्रत्येक ठिकाणच्या महसूली अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ६५ मिमीपेक्षा जास्त ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे, किंवा ३३ मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेल्या मंडळामध्ये पंचनामे करण्याची आवश्यकताच नसल्याचे ते म्हणाले. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारकडे पैसा आहे मात्र, इच्छाशक्ती नाही असा आरोपही आमदार निलंगेकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनंत गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही; पवारांवरील टीकेमुळे संजय राऊत व्यथित ?
- मराठवाडा चिंब; पुन्हा सर्वदूर पडलेल्या पावसाने मराठवाड्यातील धरणे तुडुंब
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- पन्नास लाखांसाठी तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार – चंद्रकांत पाटील
- ‘महाराष्ट्राची परंपरा आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिले नाही?’, चंद्रकांतदादांचा काँग्रेसला सवाल


