🕒 1 min read
मुंबई: कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी तीक्ष्ण चाकूने त्यांच्यावर वार केले होते. याप्रकरणी भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. आता नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारने नारायण राणेंना अटक केली. त्याचं शेवटी काय झालं? त्यावेळी न्यायालयानं सरकारला झापलं. नारायण राणेंना दोन दिवसांत जामीन द्यावा लागला होता. सरकारला जे करायचं ते करू देत. नितेश राणे यांना अटक झाली तरी भाजप त्यांच्या पाठिशी उभे राहील. लोकशाही अजूनही संपलेली नाही. त्यांना अटक केलीच तर न्यायालयात जाऊन दाद मागू. नितेश राणेंसाठी भाजप समर्थ असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान याबाबत नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर भाजपप्रणित पॅनेलचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपला निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होण्याची आशा आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते मला नाहक शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केशव उपाध्ये यांनी अंध भक्तांसारखे बघू नये; ‘त्या’ आरोपानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- हे सरकार नक्की कोण चालवत आहे? भरती घोटाळ्यावरून भाजपचा सवाल
- विराट कोहलीच्या सततच्या फ्लॉप शोवर आशिष नेहराची मोठी प्रतिक्रिया
- अभिनेत्री प्राजक्ता माळीने केले ‘या’ माजी मंत्र्याचं तोंडभरुन कौतुक; नेटकरी म्हणाले पैशासाठी ‘ही…’
- मंत्री वडेट्टीवारांकडून शिवाजी महाराजांचा अपमान; भाजपचा आरोप


