🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) च्या दुसऱ्या उपांत्य फेरी (Semi final) मध्ये इंग्लंड (England) संघाने भारतीय (India) संघाला 10 विकेट्स पराभूत केले. या पराजयामुळे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता नाराज झाला असून टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे सगळेजण नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाच्या या पराभवानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींकडून देखील संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. कारण अंतिम सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि भारत यांचा सामना बघायची चाहत्यांना आतुरता लागली होती. पण उपांत्य फेरीमध्ये भारताच्या पराभवामुळे चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याने उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलरवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” संपूर्ण राष्ट्राच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही मनापासून तयारी केली होती. तरीही तुम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नसला, तरी आम्ही तुमच्या उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवासाचा आनंद लुटला आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशाचं ओझं बाळगून इतक्या मोठ्या स्तरावर खेळताना तुमच्यावर किती दबाव पडत असेल याचा आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही.”
या पोस्टमध्ये पुढे अजय देवगन म्हणाला की, ” जिंकणे किंवा हरणे हा खेळाचा एक भाग आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. चांगल्या परिस्थितीबरोबरच वाईट परिस्थितीमध्ये आम्ही जगातल्या सर्वोत्तम संघाच्या पाठीशी उभे आहोत. त्यामुळे नाराज न होऊन जाता पूर्वीपेक्षा अधिक मजबूतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपण पुनरागमन करू.”
T20 World Cup | टीम इंडियाच्या पराभवानंतर अजय देवगनने केली भावूक पोस्ट, म्हणाला…https://t.co/UGw25pGDdd
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) November 12, 2022
तर दुसरीकडे, अभिनेता फरहान अख्तर याने देखील भारतीय क्रिकेट संघाला संबोधून एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “इंग्लंडने भारतीय संघाला मागे टाकले असेल तरी, भारतीय संघाच्या दमदार कामगिरीसाठी आम्ही तुमचे अभिनंदन करत आहोत. इंडियासाठी तो एक निराशाजनक दिवस होता पण हा प्रवास इथेच संपत नाही.”
T20 World Cup | टीम इंडियाच्या पराभवानंतर फरहान अख्तरने केली भावूक पोस्ट, म्हणाला…https://t.co/pHoxZqflzL
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) November 12, 2022
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Project | मोठी बातमी! महाराष्ट्राच्या हातून आणखीन एक प्रकल्प गेला, उर्जा उपकरण निर्मीती झोन ‘या’ राज्यात गेला
- IPL 2023 | IPL 2023 मध्ये ‘हा’ संघ बदलू शकतो कॅप्टन
- OnePlus Mobile Launch | लवकरच लाँच होणार OnePlus चा ‘हा’ मोबाईल
- Sanjay Raut | “कीर्तिकरांना लोक उद्यापासून…”, कीर्तीकरांच्या पक्षांतरावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- Job Alert | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘या’ पदांच्या 787 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
