Share

पुरामुळे पेरणी न करु शकलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा बिहार सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

पटना – पुरामुळे लागवड करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांनाही राज्य सरकारकडून अर्थसाहाय्य दिलं जाईल असं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलं आहे. पीक नुकसानाच्या इतर सर्व प्रकरणांचे योग्य मूल्यमापन करण्याचे निर्देश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले .

राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत सुनिश्चित करण्यास नितीशकुमार यांनी सांगितलं. बिहारमध्ये आतापर्यंत 26 जिल्ह्यांमध्ये 16 लाख 60 हजार कुटुंब पूरामुळे बाधित झाली असून 69 लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत, यापैकी सुमारे आठ लाख प्रभावित कुटुंबांना मदत म्हणून 477 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलं आहे

दरम्यान, उर्वरित बाधित कुटुंबांना या महिन्याच्या अखेरीस मदत दिली जाईल अशी माहिती कुमार यांनी दिली. बिहार सरकार पूरग्रस्तांना प्रत्येकी सहा हजार रुपये देत आहे असं नितीश कुमार यांनी सांगितलं. बिहारमधील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!