नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, पहिला टप्पा मतदानाची तारीख 28 ऑक्टोबर असणार आहे तर, दुसरा टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तिसरा टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर होणार आहे. तर बिहार निवडणुकीचा निकाल हा 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
दरम्यान, कोरोना काळात होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने अनेक नवे नियम घालून दिले आहेत. त्यात उमेदवरांना सिक्युरिटी डिपॉझिटही ऑनलाईन जमा करावं लागेल. यंदा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली आहे. तर सर्व मतदान केंद्र तळ मजल्यावरच असतील. उमेदवारांबद्दल वेबसाईटवर माहिती द्यावी लागेल. उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक केली जाईल
दरम्यान, सोशल मीडियाचा वापरदेखील एक आव्हान आहे. सोशल मीडियाद्वारे कुणीही समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यंदा निवडणुकीसाठी केवळ व्हर्च्युअल प्रचार केला जाणार आहे. मोठ-मोठ्या जनसभा भरवता येणार नाहीत अस निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये एका मतदान केंद्रावर केवळ १००० मतदार एकावेळी उपस्थित राहतील. करोना रुग्ण मतदानाच्या शेवटच्या तासात मतं देऊ शकणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे, फडणवीसांचा जोरदार टोला
- संग्राम जगताप यांची खेळी यशस्वी; मनोज कोतकर स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध
- कोरोना रोखण्यात सरकारची आरोग्य यंत्रणा अपयशी, प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप
- ड्रग्स प्रकरण बॉलीवूड कडून क्रिकेटकडे ? शाहरुख खानच्या टीम वर आरोप…
- कंगनाच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान…


