मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडसह संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद उफाळू आला आहे. अभिनेत्री कंगना रनौत, दिग्दर्शक अभिनव कश्यप, अभिनेते प्रकाश राज यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीची काळी बाजू जगासमोर आणली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे नेतृत्व हरपले, हरिभाऊंच्या आठवणीत गुलाबराव झाले भावुक
या प्रकरणावरून नेटकऱ्यांनी देखील करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, संजय लीला भन्साळी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या सर्वांवर टीका होत असतानाच बिहारमधील एक वकिल सुधीर कुमार ओझा यांनी या सर्वांविरोधाततक्रार दाखल केली आहे. ‘मी माझ्या तक्रारीत नमूद केलं आहे की सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होऊ दिले नाही. या अशा परिस्थितीने त्याला आत्महत्या करण्यासाऱखे मोठे पाऊल उचलायला भाग पाडले’, असे ओझा यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या प्रकरणी व्यावसायिक शत्रुत्वाच्या अँगलने देखील तपास केला जाईल असे सांगितले आहे. सुशांत सिंह राजपूत याने या रविवारी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
कोविड-19 रुग्णासंदर्भातील आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेऊ नका- राज्य सरकार
दरम्यान, सुशांतच्या दोन्ही माजी मॅनेजरचे जबाब पोलिसांकडून घेण्यात आले आहेत. दोन्ही मॅनेजर ऑक्टोबर १९ ते जानेवारी २० या कालावधीत सोबत नव्हते. सुशांतने त्यांना जायला सांगितलं होतं. सुशांतकडे फारसे काम नसल्यामुळे त्याने जायला सांगितलं होतं. पुन्हा फेब्रुवारी-मार्चमध्ये भेटू असं तो म्हणाला होता. कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांचा जबाबही पोलीस घेत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

