मुंबई : भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनाच्या आजारात निधन झाले, ते ७१ वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यानंतर, त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुजय विखेंना महापालिकेतील ‘नॉलेज’ नाही, भाजप नेत्याचा घरचा आहेर
हरिभाऊ जावळे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. जळगावमध्ये त्यांची स्वॅबची चाचणी केली असता कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जावळे यांना उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सात दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी हरिभाऊ जावळे यांना वाहिली आहे.
एक शांत, अजातशत्रू व सोज्वळ नेता म्हणून हरिभाऊ कायम स्मरणात राहतील. लोकाभिमुख कामांमुळे त्यांनी विधानसभा आणि लोकसभेत आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने जळगाव जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा भावना गुलाबराब पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
जे शेतकरी तुमच्यासाठी लढले त्यांचा विश्वासघात झाला, सदाभाऊंचा शेट्टींवर निशाणा
हरिभाऊ जावळे यांची यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती. हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार तथा दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद देखील भूषवले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

