🕒 1 min read
IND vs BAN 1st Test | चट्टोग्राम : आज बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना (IND vs BAN 1st Test) जहुर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. केएल राहुल (KL Rahul) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. तर, हा सामना सुरू होण्याआधी बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्याच्या सराव सत्रादरम्यान बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन काही प्रमाणात अस्वस्थ झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) सामान्याआधी बांगलादेशचा कर्णधार रुग्णालयात दाखल
बांगलादेश मीडिया रिपोर्टनुसार, शाकिब अल हसन मंगळवारी सकाळी सरावासाठी मैदानावर पोहोचला होता. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करावे लागले. अशा परिस्थितीत शाकिबसोबत स्टाफचा एकही सदस्य रुग्णवाहिकेमध्ये सपोर्टसाठी गेला नव्हता. दरम्यान, आता तो पहिला सामना खेळू शकेल की नाही? असा प्रश्न उद्भवला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाकिब अल हसनला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झालेली नाही. तो जेव्हा अस्वस्थ झाला त्यावेळी मैदानावर कोणतेही दुसरे वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात न्यावे लागले. शाकिबने बरगड्या आणि खांद्यामध्ये वेदना जाणवत असल्याची तक्रार केल्यामुळे, त्याला हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले होते. शाकिब अल हसन काही वेळानंतरच मैदानावर परतला होता. मात्र, नंतर त्याने सराव केला नाही. त्यामुळे आता बांगलादेश संघामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघामध्ये शुबमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, श्रीकर भरत, जयदेव, जयदेव नवदीप सैनी, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार या खेळाडूंचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devoleena Bhattacharya | ‘गोपी बहू’ला लागली हळद, देवोलीना भट्टाचार्य बांधणार लग्नगाठ?
- Maharashtra Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
- Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा
- Nitesh Rane | “..तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते”; नितेश राणेंचा पवारांवर पलटवार
- Prakash Ambedkar | “काँग्रेसने आम्हाला चेपलं, आता उद्धव ठाकरेंनी ठरवावं की…”; शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

