Share

मोठी बातमी : देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० लाख पार!

Published On: 

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ६९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण देखील वाढत असले तरी एका तब्बल दिवसात साठ हजारांवर वाढ होताना गेले अनेक दिवस दिसत असून कोरोनाबाधितांचा आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे.

देशात काल ६९ हजार २३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५६ हजार ७०६ वर गेला असून आतापर्यंत एकूण ३० लाख ४४ हजार ९४० रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच काल, दिवभरात ५७ हजार ९८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण २२ लाख ८० हजार ५६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

“राज्यातील कृषी खात झोपलं आहे का?” राज्यमंत्री बच्चु कडूंचा सरकारला घरचा आहेर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहिती नुसार, सद्या ७ लाख ७ हजार ६६८ ऍक्टिव्ह केस संपूर्ण देशभरात आहेत. यातील १ लाख ६९ हजार ८३३ ऍक्टिव्ह केसेस एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत तर या पाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये ८९ हजार ३८९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. २२ ऑगस्ट रोजी एकूण ८ लाख १ हजार १४७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या ‘त्या’ सुचनांवर योग्य तो निर्णय घेऊ : गृहमंत्री अनिल देशमुख

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!