मुंबई : काही वेळापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांनी गाठून कंगनाच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईवर प्रश्न केले. शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना आता तापला असून इतके दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांना भिडणाऱ्या कंगनाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिले आहे. शिवसेनेकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली जात नसली तरी कंगनाने आज देखील आपले शाब्दिक युद्ध सुरुच ठेवले आहेत.
त्यामुळे, संजय राऊत आता काय प्रतिक्रिया देणार हे महत्वाचे मानले जात होते. मात्र, कंगना प्रकरणी सांख्य राऊत यांनी मौन पाळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता शिवसेनेने नरमपणा का घेतला असेल यावरून चर्चा रंगु लागल्या आहेत. तर, खुद्द शरद पवार यांनी देखील कंगनाची कार्यालायवरील कारवाई चुकीची असल्याचे मत मांडल्याने शिवसेना या भूमिकेवरून एकटी पडल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, कालच कंगनाबद्दल कोणीही प्रातिक्रिया देऊ नका असे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहे. कंगनाने मात्र आज सकाळी एक ट्विट करून पुन्हा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. या ट्विटमधून तिने वडिलांची पुण्याई तुम्हाला पैसा देऊ शकते पण सम्मान स्वतःला कमवावा लागतो, माझे तोंड बंद कराल तर माझ्यानंतर लाखोंचा आवाज गुंजेल, कित्येकांचे तोंड बंद कराल? किती जणांचे आवाज दाबाल? कधी पर्यंत सत्यापासून दूर धावाल? तू काहीच नाहीयेस. फक्त वंशवादाचा एक नमुना आहे, अशा शब्दांत तिने टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार
विद्यापीठाच्या निर्णयात स्पष्टता नसून फक्त गोंधळ, ऑनलाइन परिक्षा देणार कशी- कमलाकर शेटे
..तर सरकारला जबर किंमत मोजावी लागेल! खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

