मुंबई : कोरोनाच्या निर्बंधांमुळे विविध दुकानं, हॉटेल्स ठराविक वेळेतच खुली ठेवण्याबाबतचे आदेश आता रद्द करण्यात आले आहेत. पूर्वीप्रमाणेच या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचे नवे आदेश जाहीर केले आहेत. यामुळे दुकानदार आणि हॉटेल चालकांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
कोरोना रुग्णआलेख घसरल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. करमणूक उद्यानेही (अम्युझमेंट पार्क) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात दुकाने आणि उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवून देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी आणि उपाहारगृह मालकांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
बुधवारपासून महाविद्यालये, तर शुक्रवारपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार आहेत. त्याच दिवसापासून करमणूक उद्याने खुली करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शॉपिंग मॉल, सर्व व्यापारी दुकानांची वेळ वाढवून देताना रात्री १२ नंतर कोणतेही दुकान सुरू राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. वेळमर्यादा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेत. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्ये रात्री ११ पर्यंत व्यवहार खुले ठेवण्यास मुभा दिली आहे. याबाबत आज बुधवारी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्यात.
काय आहेत आदेश?
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आता राज्य शासनानं विविध दुकानं आणि हॉटेल्स-रेस्तराँ पुन्हा खुली करण्यास परवानगी दिली आहे. पण कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वेळा, कोरोनापासून बचावासाठीची आदर्श वागणूक, सेवा देणारे आणि सेवा घेणारे या दोघांचे पूर्ण लसीकरण, क्षमतेवरील निर्बंध हे कोविड अधिनियमानुसार लागू राहणार आहेत. येत्या काळातील सणावारांच्या पार्श्वभूमीवर विविध दुकानं, रेस्तराँ, हॉटेल्स आदींमध्ये विविष्ट वेळेत मोठी गर्दी होत असते त्या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्यानुसार, आता हॉटेल्स आणि रेस्तराँ आता मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुली राहतील तर इतर सर्व प्रकारच्या दुकानांना रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास तात्काळ प्रभावानं परवानगी देण्यात आली आहे. पण स्थानिक परिस्थिती लक्षात घेता संबंधित ठिकाणी काही बंधनं लागू होतील. पण यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सीईओंनी कसली कंबर

