Share

मोठी बातमी: नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली तब्बल १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

Published On: 

मुंबई : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यानंतर अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे.

मात्र, शेतकऱ्यांचा रोष वाढला असून मुख्यमंत्र्यांनी सरसकट आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी उद्विग्न मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.

या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार, जिरायत व बागायत क्षेत्रासाठी रु. १० हजार प्रतिहेक्टर, फळपिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रति हेक्टर देण्याची घोषणा करण्यात आली असून २ हेक्टरच्या मर्यादेत ही मदत करण्यात येणार आहे. तसेच, मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी व घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल, असं सांगण्यात आले आहे.

या एकूण पॅकेजमध्ये शेतीनुकसान भरपाई, घरपडझड आणि जनावरांच्या नुकसान भरपाईसोबतच इतर नुकसानीचे देखील समावेश करण्यात आला आहे. रस्ते पूल – रु. २६३५ कोटी, नगर विकास रु.३०० कोटी, महावितरण ऊर्जा २३९ कोटी, जलसंपदा रु. १०२ कोटी, ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा रु. १००० हजार कोटी, कृषी शेती व घरांसाठी ५५०० कोटी आदी नुकसान प्रकारांचा समावेश करून एकूण १० हजार कोटींच पॅकेज तयार करण्यात आले आहे. सणासुदींचे दिवस बघता दिवाळी आधी ही मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!