टीम महाराष्ट्र देशा : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मंगळवारी शेरास सव्वा शेर हे कार्य रंगले. यात सदस्यांनी त्यांना योग्य वाटेल त्या स्थानावर उभे राहून चर्चा करायची असे सांगण्यात आले होते.
त्यानंतर त्यांच्या अंतिम स्थानावर उभे राहून त्यांच्या आधीच्या क्रमांकापेक्षा ते खाली का आहेत तसेच नंतरच्या क्रमांकापेक्षा वरचढ का आहेत याचे स्पष्टीकरण द्यायचे होते. सर्व सदस्यांनी सामंजस्याने आणि विचारविनिमय करून सर्वानुमते निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडली.
शेरास सव्वा शेर या टास्कमध्ये अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात अभिजीत बिचुकले हे चार क्रमांकावर उभे आहेत आणि रुपालीच्या मते तो क्रमांक तिला हवा होता. कारण, बिचुकले यांनी काहीही काम केलेले नाही, तसेच ते टास्कमध्ये देखील फितूर होते.
तसेच रूपालीने बिचुकले यांना ते स्टाँग नसल्याचं सांगितलं. त्यावर बिचुकले म्हणाले. रुपालीने केलेल्या एका वक्तव्यावर बिचुकले खूप चिडले आणि ते म्हणाले घरापर्यंत पोहचू नकोस… असं काय बोलली रुपाली की अभिजीत बिचुकले यांचा पारा चढला आणि ते भांडण विकोपाला गेले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

