🕒 1 min read
औरंगाबाद : येणाऱ्या काळात महिला काँग्रेसची कार्यकारिणी तयार करा, आपल्या जिल्ह्यात महिलांशी संबंधित कुठल्या समस्या आहेत याचा आढावा घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. काँग्रेस पक्षाच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी रविवारी (दि. १८) शहरातील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या बळकटीकरणासाठी सूचना केल्या. तसेच मराठवाड्यातील बालविवाहाची गंभीर परिस्थिती पाहता महिला काँग्रेस राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
शहर महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पक्षाच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी येत्या काळात महिला काँग्रेस सक्षमपणे संघटना उभारणार असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत कोरोनाच्या परिस्थितीत औरंगाबाद शहरात महिला काँग्रेसची कार्यकारिणी तयार करण्यात आलेली नव्हती. मात्र आता लवकरच शहरात महिला पदाधिकाऱ्यांची निवड आणि नियुक्त्यांची घोषणा केली जाईल. अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकारांनी उपस्थित केलेल्या बालविवाहाच्या मुद्द्यावर बोलतांना संध्या सव्वालाखे यांनी सांगितले, मराठवाड्यातील बालविवाहाची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. शिक्षण बंद असल्याने या काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लवकरच महिला काँग्रेस संपूर्ण राज्यात हेल्पलाईन सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. येणाऱ्या काळात होणाऱ्या विविध निवडणूकांमध्ये महिलांना समान संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, सरोज मसलगेकर यांच्यासह आदी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘२०२४ च्या निवडणुकीत आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू’ ; रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला
- चार दशकांच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर विद्यापीठात होणार संतपीठाचा अभ्यासक्रम, वारकरी वर्गाने व्यक्त केले समाधान!
- कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांना विशेष पॅकेजसाठी पाठपुरावा करणार-खा.सुप्रिया सुळे
- चेंबूर दुर्घटना; ‘मृतांच्या कुटुंबीयांना मनपाने दहा लाखांची मदत द्यावी’, आठवलेंची मागणी
- सोमवारपासून ४९ स्मार्ट बसेस औरंगाबादकरांच्या सेवेत, मात्र स्मार्ट बसस्थानकांवर छप्पर कधी येणार? प्रवाशांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
