Share

सोमवारपासून ४९ स्मार्ट बसेस औरंगाबादकरांच्या सेवेत, मात्र स्मार्ट बसस्थानकांवर छप्पर कधी येणार? प्रवाशांचा सवाल

Published On: 

औरंगाबाद : मागील आठवड्यापर्यंत टप्प्याटप्प्याने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने शहरात ४१ स्मार्ट सिटी बसेस सुरू केल्या होत्या. त्यातच आता सोमवारपासून (दि.१९) आणखी आठ नवीन स्मार्ट सिटी बसेस रस्त्यांवर उतरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून एकूण ४९ बसेस १८ प्रमुख मार्गांवर शहरवासीयांना सेवा देणार आहे. स्मार्ट सिटीद्वारे बसेसची संख्या वाढवण्यात येत असली तरीही अजूनही अनेक बसथांबे छप्पराच्या प्रतिक्षेत आहेत. पावसात प्रवाशांना तसेच थांबावे लागत असल्याने लवकरात लवकर बसथांब्यांनाही स्मार्ट करावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार ७ जूनपासून शहरातील सर्व व्यवहार सुरुळीतपणे सुरु झाले. त्यामुळे ८ जूनपासून शहरातील प्रमुख ५ मार्गांवर १६ सिटीबस सुरु करण्यात आल्या. त्यानंतर १४ जूनपासून आणखीन ६, २१ जूनपासून १३ बसेस प्रमुख सात मार्गांवर सुरू करण्यात आल्या. त्यानंतर १२ जुलै रोजी आणखी ९ स्मार्ट सिटी बसेस प्रवाशांच्या मागणीवरून सुरू करण्यात आल्या. त्यात आता पुन्हा सोमवारपासून आणखी आठ बसेस सुरू करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी बस विभागाने घेतला आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने स्मार्ट सिटी बसकरीता खासगीकरणातून १५० बसथांबे बांधण्याचा निर्णय घेतला होता. या बसथांब्याच्या माध्यमातून मनपाला आर्थिक उत्पन्न आणि प्रवाशांना थांबण्यासाठीची सोय हे उद्देश होते. दिडशे पैकी १०८ बसथांबे सुनियोजित जागी उभारण्याचे काम झाले असून उर्वरित ४२ चे काम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेले आहे. या १०८ बसथांब्यापैकी अनेक थांब्यांना पावसाळा सुरु होऊनही छप्पर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे स्मार्ट बसथांब्यावर भिजण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!