🕒 1 min read
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या भीमा-कोरेगावमध्ये 2018 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. 83 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमधून अटक करण्यात आली आहे.
भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली.
Stan Swamy received funds through an associate for furtherance of CPI (Maoist) activities. Documents related to communications for furthering the activities of CPI (Maoist) & propaganda material of the CPI (Maoist) as well as literature, seized from his possession: NIA sources https://t.co/CQDl1KlAtk
— ANI (@ANI) October 9, 2020
एनआयएच्या टीमनं स्टेन स्वामी यांची जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात चौकशी केली होती. तसंच त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. परंतु वयोमानानुसार आणि करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रवास करू शकत नाही असं स्वामी यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
दरम्यान, भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरण महाराष्ट्र तसेच अवघ्या देशभरात चर्चेत आहे, या प्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फेरेरा आणि वर्नॉन गोंजालविस यांना अटक केली. पुणे पोलिसांनी कोर्टात म्हटले होते की अटक केलेले पाच जण भाकपाचे सदस्य आहेत तर एल्गार परिषद देशातील शांतता आणि अस्थिरता निर्माण करण्याचं काम करत असल्याचा पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या अहवालात म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे’
- सोलापूरमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; एमआयएम फुटीच्या उंबरठय़ावर
- महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आता भाजपही करणार राज्यभर निदर्शने
- ‘MPSC परीक्षा पुढे ढकलाव्यात,अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील’
- मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असताना सरकारला एमपीएससी परिक्षा घेण्याची एवढी घाई का आहे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
