Share

कोरोना को हाराना है ये हमारा ब्रिद, आज आई है मुस्लीम समाज की ईद : आठवलेंच्या कवितेतून शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना को हाराना है ये हमारा है ब्रिद,आज आई है मुस्लीम समाज की रमजान ईद, असे म्हणत  कोरोनाचा प्रादुर्भाव संपविण्याचा निर्धार या रमजान ईद ला करूया असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले आहे. तर यंदा कोरोना च्या संकटामुळे रमजान ईद ची नमाज पठण घरीच करावे; घरी राहून गर्दी न करता रमजान ईद चा उत्सव साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले.

पवित्र रमजान महिन्यात पूर्ण महिना उपवास केला जातो. रमजान महिन्याच्या अखेरीस ईद येते. रमजान ईद म्हणून संपूर्ण जगात साजरी केली जाते. पवित्र रमजान ईद हा सण भारतात एकता ; बंधुत्व; शांतता प्रेम वृद्धिंगत करणारा उत्सव म्हणून साजरा होतो.
मुस्लिम बांधवाना सर्व धर्मीय गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. यंदा कोरोना च्या संकटामुळे रमजान ईद ची नमाज पठण घरीच करावे; घरी राहून गर्दी न करता रमजान ईद चा उत्सव साजरा करावा, असे   आठवले म्हणाले.

दरम्यान,रमजान ईद निमित्त राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा, बंधूभाव जपत घरच्या घरीच रमजान ईद साजरी करावी असे मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

गेल्या दोन अधिक महिन्यांपासून राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू आहे. याच काळात नागरिकांना विविध सण – उत्सव घरच्या घरी साजरे करावे लागले. गेल्या एक महिन्यापासून मुस्लिम बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास देखील सुरू होते. यादरम्यान मुस्लिम बांधवांनी नमाज, सहरी, इफ्तार आधी धार्मिक विधी घरच्या घरीच साजरा केले.

सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद – उल – फित्र अर्थात रमजान ईद हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. कोरोना विषाणूचा सर्वत्र झालेला शिरकाव व संभाव्य धोका लक्षात घेता, सर्व समाज बांधवांनी घरच्या घरीच ईद साजरी करावी. एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी कुठेही एकत्र न जमता, मोबाईल फोन, सोशल मिडियासह अन्य माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहनही  मुंडे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

हे आहेत खरे हिरो ! मुळचे नगरचे मात्र तेलंगणात कार्यरत असलेले IPS भागवतांनी केले मोठे कार्य

… तर मग आता परप्रांतीयांना आमची परवानगी घ्यावी लागेल, CM योगींना राज ठाकरेंचा दणका !

इथून पुढे कोणतेही राज्य परवानगीविना उत्तर प्रदेशच्या मजुरांना घेऊ शकत नाही : आदित्यनाथ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!