Share

रुग्णांच्या जीवाशी खेळणारा बंगाली ‘मुन्नाभाई’ जेरबंद!

Published On: 

वैजापूर : वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना गेल्या दोन वर्षांपासून रुग्णांवर खुलेआमपणे वैद्यकीय उपचार करणाऱ्या एका बंगाली मुन्नाभाई डाॅक्टरच्या गुरुवारी (दि.१) आरोग्य विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाने त्या दवाखान्यावर छापा टाकून इंजेक्शन्स, सलाईन व विविध प्रकारची १९ औषधी हस्तगत केली आहेत. याप्रकरणी त्याच्याविरुध्द शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन सोतिष मित्रा ( ४५) ह.मु रा. सासेगाव ता. कन्नड ( मूळ रहिवासी – पश्चिम बंगाल ) असे या बोगस डाॅक्टरचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिउद्दीन शेख यांना आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले की, तालुक्यातील मनूर येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात एका बंगाली बोगस डाॅक्टरने दवाखाना टाकून दुकान थाटले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर उपचार करून तो त्यांच्या जिवाशी खेळत आहे. त्यानुसार वैद्यकीय  पथकाने गा दवाखान्यात छापा टाकला असता तेथे नितीन मित्रा हा एका महिला रुग्णावर उपचार करीत होता. पथकाने मित्रा याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यावर त्याने मी डाॅक्टर असून येथील रुग्णांवर उपचार करतो. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर त्याची बोलती बंद झाली.

व त्याने ते देण्यास नकार दिला. परंतु पथकाने त्याला दरडावून विचारणा केल्यानंतर त्याने माझ्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही सनद अथवा पदवी नसून मी याशिवाय दवाखाना चालवून रुग्णांवर उपचार करीत असल्याची कबुली दिली. पथकाने दवाखान्यातून इंजेक्शन, सलाईन व विविध प्रकारची औषधी हस्तगत करून या मुन्नाभाईस पोलिसांच्या मदतीने ठाण्यात नेले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोगस बंगाली डाॅक्टर नितीन मित्रा याच्याविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!