Share

ही अभिनेत्री करणार ‘व्हॉट्सअप लग्न’

Published On: 

🕒 1 min read

पवित्र रिश्ता या सिरीयल मधून पदार्पण केलेली व कॉफी आणि बरच काही, मितवा यासारखे हिट चित्रपट देणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी प्रार्थना एका आगळ्या- वेगळ्या लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ‘व्हॉट्सअप लग्न’

आता तुम्ही विचार कराल हे कसल नवीन लग्न ? ‘व्हॉट्सअप लग्न’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येईल.‘नटसम्राट’ चे निर्माते विश्वास जोशी आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नानू जयसिंघानी यांनी प्रथमच एकत्र येत ‘व्हॉट्सअप लग्न’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ म्हणजेच पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याप्रमाणे वर्षभर किंवा सहा महिने आधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्याची परंपरा आहे, त्याप्रमाणेच ‘व्हॉट्सअप लग्न’च्या निर्मात्यांनीही जवळजवळ चार महिने अगोदर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करीत सुनियोजित पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्याचा संदेश दिला आहे.

म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं हा देखील यामागचा हेतू आहे.प्रदर्शनाची तारीख अगोदर घोषित केल्याने ऐन वेळी होणारा तारखांचा घोळ टाळता येईलच, पण त्यासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळेल हा एक महत्त्वपूर्ण विचारही ‘व्हॉट्सअप लग्न’ च्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे ‘नटसम्राट’ या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं असून, पोस्ट प्रोडक्शनचं काम लवकरच पूर्ण होईल.

प्रार्थनाच्या रिल लाईफ व्हॉट्सअप लग्न हे पुढच्या वर्षी लागणार असले तरीही रिअल लाईफ लग्न मात्र 14 नोव्हेंबरला लागणार आहे.दिग्दर्शक अभिषेक जावकरसह ती लग्नबंधनात अडकणार आहे.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!