🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने पुढील दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा मागील आठवड्यात केली. यादरम्यान बीसीसीआयने शुक्रवारी १४ मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचीही घोषणा केली आहे. एक कसोटी. ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
इंग्लंडच्या या दौऱ्यात मुख्य प्रशिक्षकाची धुरा हे रमेश पोवार हे साभांळणार आहे. तसेच या दौऱ्यात महिला संघासाठी बीसीसीआयने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी कसोटी सलामीवीर शिव सुंदर दास यांना तर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून अभय शर्मा यांची नियुक्ती केली. तर या दौऱ्यात व्यवस्थापक म्हणून राजकुमारदेवी गायकवाड यांना पदभार देण्यात आला आहे. गायकवाड या सध्या बडोदा महिला निवड समितीच्या प्रमुख आहेत.
या दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद हे मिताली राज भुषवणार आहे. तर टी-२० संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरला देण्यात आले आहे. १६ जुनपासुन हा दौरा सुरु होणार आहे. १६ ते १९ जुन दरम्यान या मालिकेतील एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. तर २७, ३० जुन आणि ३ जुलैला एकदिवसीय सामने होणार आहे. तर टी-२० मालिका ही ९ ते १५ जुलै दरम्यान खेळवली जाईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर चक्रिवादळाचा धुमाकुळ
- बॉल टेंपरींग प्रकरणात डेविड वॉर्नरचा मॅनेजर जेम्सचा मोठा खुलासा; प्रकरणातील खरे सत्य माहित असल्याचा केला दावा
- ‘आघाडी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का?
- दिलासादायक : करोना विषाणू 99.99 टक्के नष्ट करणारी थेरेपी विकसीत करण्यात वैज्ञानिकांना आले यश
- ‘राजकीय स्वार्थासाठी देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड झाला’

