अयोध्या : येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. याच पार्श्ववभूमीवर भूमिपूजनाच्या कार्यक्रमापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी अयोध्येचा दौरा केला. त्यांनी या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं दर्शनही घेतलं. तसंच भूमिपूजनासाठी सुरू असलेल्या तयारींचा आढावाही घेतला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी राम जन्मभूमीच्या ठिकाणी भगवान श्रीरामाची पूजाही केली. तसेच मदिराची उभारणी होणारं स्थळ तसंच भूमिपूजनाच्या स्थळाचीही पाहणी करून यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजनाचा सोळला हा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून हा पार पाडला जाणार आहे. तसेच या भूमिपूजनासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात येईल.
Ayodhya: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath offers prayers to Lord Ram at Ram Janmabhoomi site.
CM will also take stock of preparations today ahead of foundation laying of Ram temple. pic.twitter.com/hoyLO9oi5r
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 25, 2020
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचं भानही यादरम्यान ठेवण्यात येईल. या कार्यक्रमात १५० निमंत्रितांसह एकूण २०० पेक्षा अधिक जण सहभागी होणार नाहीत,” अशी माहिती यापूर्वी स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली होती.
दरम्यान, “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. असंही स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले होते.
‘कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही,तर…’
‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत मोदींना आईचा पाठिंबा; केली ‘लाख’मोलाची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

