Share

मद्यपींची नवी शक्कल; जीवनावश्यक सेवा असलेल्या दुधाच्या टँकरमध्ये बिअरच्या बाटल्या

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. देशात जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व वस्तूंची विक्री बंद आहे. याचा जबर फटका बसलाय तो मद्यपींना. राज्यात कुठेही मद्य उप्लाभा होत नसताना तस्करी आणि चोरून विकणार्यांवर प्रशासनाकडून रोज बातम्या येत आहे.

आता असाच पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात चक्क एका दुधाच्या टॅँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असताना हा टँकर पोलिसांनी कात्रज भागात पकडला आहे. याबाबतच वृत्त लोकसत्ता लाईव्ह या वृत्त संकेंत स्थळाने दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी काल रात्री कात्रज परिसरात टेम्पोतील २९ हजार रुपयांचे बिअरचे १२ बॉक्स पकडले आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेत टेम्पो जप्त करून भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर दूध, भाजीपाला, किराणा वस्तू आणि मेडिकल सेवा या जीवनावश्यक सेवा सुरू असून त्यांना पोलिसांकडून पास देण्यात आले आहेत. तसेच जागोजागी पोलिसांची गस्त देखील सुरू आहे.

भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कात्रज घाट परीसरात गस्त घालत होते त्यावेळी त्यांना एक दुधाचा टेम्पो संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याला थांबविले. चालकाकडे चौकशी केली असता तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दुधाच्या कॅरेटच्या पाठीमागे ठेवलेले २९ हजार रुपयांचे १२ बिअर बॉक्स सापडले.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!