Share

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीचे लागले वेध; आत्तापासुन फोडाफोडी सुरू

Published On: 

बीड: राज्यातील महाविकास आघाडीचे दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात आगामी बीड नगर पालीकेत सरळ सरळ लढत होणार असे चित्र उभे होत आहे. निवडणूकीच्या पुर्वतयारीला राजकीय पक्षांनी एक वर्ष आधिपासुनच सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्यात संदिप क्षिरसागर यांच्या गटातील नगरसेवकांना आपल्या तंबूत घेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आघाडी घेतली आहे. पण सक्षम पर्याय नसेल तर बीडची सत्ता काका किंवा पुतण्याकडे जाईल यात शंका नाही.

मागील आकडेवारी नुसार साधारण ३० वर्षांपासून एक टर्म सोडली तर बीड पालिकेवर क्षीरसागरांची सत्ता आहे. २०१२ च्या निवडणुकीत सर्वजण एकत्र आले तेव्हा सर्वांचा ५० पैकी एक सदस्य विजयी झाला. आतापर्यंतचे परिणाम पाहता शिवसेनेला बीडमध्ये दमदार कामगिरी करता आली नाही पण, आता माजी मंत्रीच या पक्षात असल्याने भुतकाळ बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगामी काळात नगर पालिकेची निवडणूक असून त्यालाही वर्षभराचा अवधी आहे. मात्र, बीडमध्ये आतापासून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. ही आगामी निवडणुकीची पायाभरणी सुरु झालेली दिसत आहे. आजमितीपर्यंत तरी दोन्ही क्षीरसागरांच्या विरोधकांचे संघटन सक्षम पर्याय देण्याऐवढे ताकदीचे नाही. तर, शहरातील विकासाबाबतही घोषणांचा सुकाळ आणि शहर विकासाचा बट्ट्याभोळ असे कायमचे चित्र आहे. मात्र, निवडणुकीत सक्षम पर्यायच नसेल तर टीका आणि आरोपाला महत्व काय, असा साधा प्रश्न आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!