Share

अमित शाह यांना डेअरिॅगबाज संबोधत राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. सिंधुदुर्ग मध्ये अमित शाह यांची उपस्थिती भाजपसाठी व विशेषतः राणे यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

ग्रामपंचायात निवडणुकीत कोकणामध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाला नख लागले. कोकणामध्ये राणे भाजप वाढवण्यात यशस्वी ठरल्याची ही पावती होती. त्यामुळे राणे यांचे पक्षात वजन वाढल्याचे बोलले जात होते. राज्यातील महाविकास आघाडीने नारायण राणे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर लगेच केंद्र सरकारने राणेंना सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. या सगळ्या घटनाक्रमातून राणे भाजपला प्रिय झाल्याचे प्रतीत होत आहे. पण आज भाजपचे चाणक्य राणेंच्या गडात दाखल झाले असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राणे भाषणादरम्यान, नेहमीप्रमाणेच खास शैलीत बोलले आहेत. ‘मेडीकल कॉलेज बनवायचा निर्धार केला अन् तो पूर्णही केला. उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं असं स्टाफला विचारलं. ते म्हणाले तुम्ही मोठ्या डेअरिॅगनं कॉलेज स्थापन केलं. तसाच माणूस आणा. त्यावर डेअरिॅगबाज अमित शाहजी यांच्या हस्ते उद्घाटन करू,’ असं मी त्यांना आश्वासन दिलं’ अस म्हणत राणे यांनी अमित शाह यांना डेअरिॅगबाज संबोधले आहे.

पुढे बोलताना राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ‘शिवसेना नेहमी चांगल्या कामाला विरोध करतेय. आधी कॉलेज मग एअरपोर्ट चांगल्या प्रोजेक्टला विरोध करायचा, नंतर उदघाटन वेळी यायचं, याला म्हणतात आयत्या बिळावर शिवसेना’ असे म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!