बीड : कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर संकट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अशा कठीण प्रसंगीही शेतकरी भाजीपाला मंडईपर्यंत आणून भाजी पाल्याची कमतरता भरून काढत आहेत. मात्र आता बीडच्या नाळवंडी गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाला जनावरांना खाऊ घालू पण शहरात विकायला नेणार नाही, असे म्हणत भाजी विक्रीस बहिष्कार टाकला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचार बंदी शिथिल असताना ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी शहरात आलेल्या काही शेतकऱ्यांना नगरपालिका प्रशासनाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी भाजी विक्रीस बहिष्कार टाकला आहे.
संचार बंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र प्रशासनाकडून बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे यापुढे भाजीविक्री करणार नसल्याचा निर्णय इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. वेळ पडल्यास भाजीपाला गुरांना खाऊ घालू, परंतु बीड शहरात भाजीपाला पाठवणार नाही, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान नाळवंडी गावातील तब्बल 300 शेतकरी भाजीपाला विक्रीलार बीडमध्ये येत असतात. या गावातून दररोज 5 टन भाजीपाला बीड शहरात येतो. मात्र बहिष्कार घातल्याने आता बीडमध्ये भाजीपाल्याची कमतरता जाणवणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
