Share

गुरूंचं आडनाव लावल्यामुळे डॉ.आंबेडकर ब्राम्हण, नरेंद्र मोदीही ब्राम्हण! – राजेंद्र त्रिवेदी

Published On: 

🕒 1 min read

गांधी नगर: गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. डॉ. आंबेडकर हे ब्राम्हण होते आणि पंतप्रधान मोदीही ब्राम्हण आहेत, असे विधान त्यांनी केले आहे त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. श्रीकृष्णही ओबीसी होता, ज्याला सांदिपनी ऋषींनी देव बनवलं होतं, असेही त्रिवेदी यांनी म्हटले आहे. ते समस्त गुजरात ब्रम्ह समाज या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

विशेष म्हणजे त्रिवेदी यांच्या भाषणावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेलही व्यासपीठावर उपस्थित होते.

काय म्हणाले राजेंद्र त्रिवेदी ?

“ब्राम्हण कधीच सत्तेचे लोभी नव्हते. त्यांनी अनेक राजे घडवले. मी हे नेहमीच सांगत आलो आहे की, ब्राम्हणांनीच अनेकांना देवत्व मिळवून दिलं. श्रीराम हे क्षत्रिय होते, पण ऋषी-मुनींनी त्यांना देव बनवलं. गोकुळात एका गुराख्याला आपण ओबीसी म्हणतो, पण त्या ओबीसीला देव सांदिपनी या ऋषींनी म्हणजे एका ब्राम्हणाने बनवलं. मत्स्यकन्येचा मुलगा असलेल्या व्यासांनाही ब्राम्हणांनीच महत्त्व मिळवून दिले”

अर्थशास्त्र या ग्रंथाचा लेखक आणि चंद्रगुप्त मौर्याचा गुरू चाणक्य हेही ब्राम्हण होते. त्यांनी मनात आणलं असतं तर ते राजा बनले असते. पण, ब्राम्हण कधीच सत्तेचा लोभी नसतो. तो नेहमीच समाजाच्या भल्याचा विचार करतो. डॉक्टर आंबेडकर हेही ब्राम्हण होते. त्यांच्या ब्राम्हण गुरूंचं आडनाव ते लावत असल्यामुळे ते ब्राम्हण होते. मला हे सांगायला अभिमान वाटतो की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही ब्राम्हण आहेत. ब्राम्हण समाजाने देशाला पाच राष्ट्रपती, सात पंतप्रधान, ५० मुख्यमंत्री, ५० हून अधिक राज्यपाल, २७ भारतरत्न विजेते आणि सात नोबेल पुरस्कार विजेते दिले आहेत, असेही त्रिवेदी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!