🕒 1 min read
औरंगाबाद – औरंगाबादवासियांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील अंजली कोला-पोर्जे यांना मिसेस एशिया युनिव्हर्स 2021 चा बहुमान मिळाला आहे. मिसेस युनिव्हर्स प्रा.लि.तर्फे ब्युटी पिजंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विवाहित महिलांसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत अंजली यांनी हा सन्मान प्राप्त केला.
स्पर्धेबाबत माहिती देताना अंजली म्हणाल्या, कोरोनामुळे स्पर्धेच्या पाचव्या वर्षी अनेक बंधने आली होती. ऑनलाईन पद्धतीने निवडप्रक्रिया पूर्ण करून अखेरीस जगभरातील 50 महिलांची निवड करण्यात आली. राजस्थानमधील जयपूरमध्ये नुकताच स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला. यात मिसेस एशिया युनिव्हर्स 2021 चा क्राऊन आणि सन्मान अंजली यांना मिळाला.
ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व
अंजली यांचे शालेय शिक्षण परभणीतील जिंतूर येथे झाले आहे. औरंगाबादेत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 21 व्या वर्षापासून मॉडेलिंग, फॅशन ग्रुमिंग ट्रेनर आणि इव्हेंट क्षेत्रात कार्यरत आहेत. अंजली ईटीव्हीच्या मेजवानी क्विनच्या विजेत्याही आहेत. आजवर अनेक ब्युटी पिजंट कार्यक्रमांन परिक्षक म्हणून त्यांची उपस्थिती लाभली आहे. औरंगाबादसह नाशिक, पुणे आणि मुंबईत त्यांनी सौंदर्य स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्पर्धांच्या माध्यमातून नावलौकिक मिळवून देणे हे आपले ध्येय असल्याचे अंजली यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत कपात तर, आठवलेंच्या सुरक्षेत वाढ : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भिडे गुरुजींची भेट
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
