मुंबई : एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी मिळाली नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटल्यानंतर राज्य सरकारने ३१ जुलै पर्यंत रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, ३१ जुलै पर्यंत रिक्त जागा भरल्या नाही तर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा पुण्यातील विद्यार्थ्यांनी दिला आहे. यावरुन भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
उमा खापरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. त्या म्हणाल्या की, ‘पुण्यात आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा ईशारा दिलायं… जर ३१ जुलैपर्य़ंत रिक्त पद भरली नाही, तर ते सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले… महाराष्ट्र सरकार अजुन स्वप्निल लोणकरसारखे भावी अधिकारी हा महाराष्ट्र गमावणार नाही याची काळजी घ्या… लवकरात लवकर उर्वरित जागा भरा अशी मागणी महिला मोर्चाकडुन आम्ही करत आहोत.’
पुण्यात आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा ईशारा दिलायं…
जर ३१ जुलैपर्य़ंत रिक्त पद भरली नाही, तर ते सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले…
@BJP4Maharashtra @BJPMM4Maha @ChDadaPatil @Dev_Fadnavis @SMungantiwar— Uma Khapre( Modi Ka Parivar) (@umakhaprebjp) July 9, 2021
स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येमुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी परीक्षा पास झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राज्य सरकारवर आरोप होत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न समोर असल्याने या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता या नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
- ‘कामाला लागा’; उद्धव ठाकरेंचे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना आदेश !
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
- अन् संजय राऊत म्हणाले ‘…तर निवडणुकीसाठी मी पुन्हा येईन!’
- रोजगाराची मोठी संधी : राज्यातील सुमारे ६ हजारहून अधिक शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल


