Share

सावधान! बंदी असलेले प्लास्टिक वापरताय, आता थेट गुन्हा दाखल होणार

Published On: 

औरंगाबाद : शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवायांचे सत्र सुरूच आहे. यासोबतच रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, बायोवेस्ट, प्लास्टिक बाळगणाऱ्यांविरोधात देखील दंड आकारणे सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यां विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. महापालिकेने मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक जप्त केले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नागरी मित्र पथकाचे कर्मचारी चिकलठाणा एमआयडीसी दरम्यान पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकास हरिशंकर ब्रिजमोहन शर्मा यांच्याकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले. असलेल्या मालाबद्दल चौकशी केल्यानंतर मला काहीही माहित नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पथकातील कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले. पथक प्रमुखांनी समजावून दंड भरण्यास सांगितले. तरीही संबधित ऐकण्यास तयार नव्हते.

दरम्यान, हरिशंकर ब्रिज मोहन शर्मा यांच्याकडील मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवी आरोग्यासाठी व जनावरांसाठी घातक असलेल्या ५० मायक्रो एमएम पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या शासनाने बंदी असताना स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने दिसून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!