Share

IPL२०१९ : उद्घाटन सोहळा रद्द करून इंडियन आर्मीसाठी २० कोटी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आजपासून सुरु होणार्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा उद्घाटन सोहळा रद्द करून त्याची रक्कम भारतीय सैन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने आर्मी वेल्फेअर फंडमध्ये २० कोटी  देण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या उद्घाटन समारंभाची २० कोटींची रक्कम भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदलाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यापैकी भारतीय सैन्यात ११  कोटी रूपये, सीआरपीएफला ७ कोटी आणि नौसेना आणि वायुसेनास प्रत्येकी १ कोटी रुपयांच्या योगदानाचा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी मोठ्या थाटामाटात, कलाकारांच्या उपस्थितीत भव्यदिव्य अशा पद्धतीने आयपीएल चा उद्घाटन सोहळा पार पडतो. परंतु यावेळी मात्र नुकत्याच झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, लोकांच्या भावना लक्षात घेऊन, बीसीसीआय प्रशासनाच्या समितीने उद्घाटन समारंभाला रद्द करण्याचा आणि सशस्त्र दलांना ती रक्कम देण्याचा निर्णय घेतला. आज आयपीएल च्या १२ व्या पर्वाला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या सामन्याने चेन्नई येथे सुरुवात होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!