Share

बारामतीकरांनी मलाच नाही तर रोहितलाही निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार आज बारामतीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बारामतीत आले होते. राज्यात निवडणुक निकालानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी आणि त्यानंतर अजित पवार हे पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. अजित पवार शहरात आल्यानंतर मुख्यरस्त्यावरून त्यांची मोठी मिरवणूक काढण्यात आली.

भव्य हार, तुरे, फुलं फेटे यांची बरसात अजित पवारांवर करण्यात आली. क्रेनच्या साह्याने प्रचंड मोठे हार अजित पवारांना घालण्यात आले. ३  तास चाललेली ही मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी सांगता सभा झाली या सभेत अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले. यावेळी बारामतीकरांनी फक्त मलाच नाही तर रोहित पवारांनाही निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता लोकांच्या कामासाठी झटा असा सल्लाही त्यांनी सर्व पदाधिकार्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला.

अजित पवार पुढे म्हणाले, बारामतीकरांनी मला लाखाच्या वर मतांनी निवडून दिलं. त्याची सर्व देशात दखल घेतली गेली. बारामतीकरांनी इतर ठिकाणच्या जागा निवडून आणण्यासाठीही प्रचंड मेहनत घेतली आणि  संघर्ष केला. तसेच कर्जत-जामखेडमध्येही रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्या कष्टाचा उतराई मी कधीच होऊ शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

तसेच सत्ता आली तरी ती डोक्यात जाऊ देऊ नका. गैरप्रकार, गैरव्यवहार करू नका, कुठे चुकलं तर अधिकाऱ्यांशी वाद घालू नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची अनुपस्थिती मात्र सर्वाना खटकली .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!