Share

दादांचा पॅटर्न आला कामाला ! बारामती तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

Published On: 

बारामती : राज्यातील 4 जिल्हे हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर आता बारामती तालुका देखील कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बारामतीत कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींपैकी चार रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या रूग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

बारामती शहरात प्रथम एका रिक्षाचालकाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर भाजीपाला विक्रेत्याच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली. या कुटुंबांतील वयोवृद्ध असणाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता, तर याच कुटुंबातील मुलगा, सून यांच्यासह आठ वर्षाच्या आणि एक वर्षाच्या नातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. चौदा दिवसांनंतर या रूग्णांची पुन्हा तपासणी केली असता त्यांचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.

रिक्षाचालकाचा देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दहा दिवसांपूर्वीच त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.  बारामती शहरात आता सात रूग्णांपैकी एकच रूग्ण राहीला असून मेडिकल दुकानात काम करीत असणाऱ्या वडिलांना कोरोनाचा संसर्गाची लागन झाली आहे. त्यांच्यावर देखील पुण्यात उपचार सुरू आहेत.

दरम्यान बारामती तालुक्याला कोरोनाची लागण होताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आ. अजित पवार यांनी लॉकडाऊन कडक करत शहरात भिलवडी पॅटर्न सुरु केला. या पॅटर्नच्या जोरावरचं आज बारामतीकरांनी कोरोनावर मात केली आहे. तर तालुका कोरोनामुक्त करून दाखवला आहे.

काय आहे बारामती पॅटर्न…

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘बारामती पॅटर्न’ तयार करण्यात आला आहे. ‘बारामती पॅटर्न’ हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, विक्रेते, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या समन्वयातून काम करण्याचं यशस्वी मॉडेल आहे. यामध्ये राज्यशासनाच्या सर्व विभागांबरोबरच बारामती नगरपालिकेचाही महत्वाचा सहभाग आहे. बारामती नगरपालिकेचे नगरसेवक, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांचाही यात सहभाग आहे. बारामती शहरात 44 वॉर्ड आहेत. या प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकांसोबत शासनाचे एक मदत सहायता अधिकारी, एक पोलीस अधिकारी, विक्रेते, दहा स्वयंसेवक काम करत आहेत. या सर्वांचे संपर्क क्रमांक संबंधित वॉर्डमधील लोकांपर्यंत पाहोचविण्यात आले आहेत. यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य, दुध, गॅस सिलेंडर, फळे व भाजीपाला यांची यादी त्यांच्या वॉर्डातील संबंधित लोकांच्या मोबाईल टाकल्यावर काही कालावधीतच अगदी दारात नागरिकांना या वस्तू मिळत आहेत.

…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा | Can CM Gives His Resign ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!