बिजिंग : सिमाभागावरून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावावामुळे देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय. चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून आता भारताला थेट इशारा देण्यात आला आहे. भारतामध्ये काही अति राष्ट्रप्रेमी आमच्या वस्तूंबद्दल अफवा पसरवतायत. पण आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनल्यायत. हा ७ हजार कोटींहून देखील मोठा व्यवसाय आहे. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये या संदर्भात वृत्त आले आहे.
भारतात काही अतिराष्ट्रवादी चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवण हे काही पहिल्यांदाच होतं नाहीय. पण हे करणं तोट्याचं ठरु शकतं. सोनम वांगचुक यांचा व्हिडीओ आणि रिमूव्ह चायना एप एप्लीकेशनवर देखील चीनने भाष्य केलंय. चीनच्या तक्रारीनंतर हे एप्लीकेशन प्ले स्टोअरमधून हटविण्यात आले आहे. स्मार्टफोनमधून चीन एप डीलीट व्हावे या उद्देशाने हे बनविण्यात आले होते.
…तर राऊत साहेब आपणही सोनू सूद सारखे प्रसिद्ध व्हाल, मनसेचा टोला
भारत-चीन सीमावाद काही नवा नाहीय. हा इतका गंभीर देखील नाही जितका भारतातील काहीजण विचार करतायत. दोन्ही सरकार एकमेकांशी चर्चा करतायत. भारत सरकार याबाबत सकारात्मक आहे. पण आम्हाला विनाकारण बदनाम केले जात असल्याचे चीनचे म्हणणे आहे.
लॉकडाऊनमुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय. त्यात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून मध्यमवर्गीयांवर अधिक आर्थिक बोजा पडणार असल्याचे चीनचे म्हणणे आहे. भारतीयांकडील अधिक स्वस्त सामान हे चीनकडून येते. त्यामुळे बहिष्कार करण भारताला शक्य नसल्याचे चीनी इंस्टिट्यूट ऑफ कंटेंप्ररी इंटरनॅशनल रिलेशनचे लोऊ चुन्हाऊ यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

