टीम महाराष्ट्र देशा – अमृता फडणवीस यांनी आज ABP माझा या वृत्त वाहिनीला महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचरण्यात आले. यात त्यांनी विविध विषयांवर आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.
आपल आणि देवेंद्रजींच व्यक्तिमत्व वेगळ आहे आणि मी व्यक्त होते ते मझा स्वतःच मत असतं असा त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मला खूप ट्रोल केलं गेलं आहे परंतु काही वेळा त्यांचे मुद्दे बरोबरही असतात. तसेच यामुळे मला चांगल काम करण्याची प्रेरणा आणि उर्जा मिळते असाही त्या म्हणाल्या.
माझ्या स्पष्ट बोलल्यामुळे मला खूप तोटा झाला. परंतु मी मागे फिरणार नाही. घाणेरडे ट्वीट करत लोकांनी टीका केले. तर बँकेपर्यंत गेले आहेत. परतू बँकेचा व्यवहार आणि आपला संबंध नाही. तो बँक आणि सरकारमध्ये एक स्वतंत्र व्यवहार आहे. वेगळे लोक ते पाहतात , ज्यात तंत्रज्ञान आणि इतर गोष्टी बघून निर्णय घेतला जातो.
परंतु तरीही बँकेच्या मागे लागण ही विकृती आहे असा दावा अमृता फडणवीस यांनी या मुलाखतीत केला आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

